CM शिंदेंची दिल्लीवारी, सकाळी ED राऊतांच्या घरी ! कारवाईच्या टायमिंगची चर्चा !!

रविवारची सकाळ झाली तिच एका राजकीय भूकंपाने ती म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी जावून ईडीने कारवाई सुरु केली. १० जणांची टीम सकाळपासून संजय राऊत यांच्या घरी असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. या संदर्भात राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या संजय राऊत यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे असे ही म्हटले जावू लागले. संजय राऊत यांच्या घरी ईडीने केलेल्या कारवाईच्या टायमिंगबाबत सध्या सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे. 

आपल्याला माहितच असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना अचानक त्यांना दौरा अर्धवट सोडून दिल्लीला जावे लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आज सकाळीच संजय राऊतांच्या घरी ईडी दाखल झाली हा निव्वळ योगायोग आहे की आणखी काही अशा चर्चा सध्या रंगलेल्या आहेत. संजय राऊत यांना समन्स देण्यात आले होते पण त्यांच्याकडून काही उत्तर मिळाले नाही आणि ते चौकशीत सहाकर्य करत नाही म्हणून ही कारवाई करण्यात आली असे म्हटले जाते आहे. तर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आलेल्या आदेशावरून ईडीचे पथक कारवाई करण्यासाठी राऊतांच्या घरी धडकले असे सांगण्यात येत आहे. 

दुसरी महत्त्वाची गोष्टी म्हणजे शनिवारपासून राज्यात राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. शिवसेनादेखील यावर आक्रमक झाली होती. या प्रकरणातून माध्यमांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी ही कारवाई केली का अशी ही चर्चा रंगलेली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी तर यासंदर्भात ट्विट करून राज्यपालाच्या कालच्या वक्तव्यावरील गदारोळाला थांबविण्याकरता भाजपाने ची ही नवी खेळी.आज ईडीचे पाहुणे श्री संजय राऊत यांच्या घरी पाठवून राज्यपालांचा राजीनामा भाजपने वाचविला असे म्हटले आहे.

शिवसेनेत बंड झाल्यानंतर संजय राऊत यांनी भाजप आणि बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली होती. दररोज ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आक्रमक आणि प्रखरपणे मांडत असतात. काही दिवसांपूर्वी ईडीने त्यांची १० तास चौकशी केली होती तरीसुद्धा संजय राऊत यांनी आपला आक्रमकपणा कमी केला नव्हता. रविवारी त्यांच्या घरी ईडीची चौकशी सुरु असताना आपण कारवाईला घाबरत नाही असं ट्विट केलं होतं. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.