BMC निवडणुकीत मनसेचा स्वबळाचा नारा !

महापालिका निवडणुकीआधीच शिंदे गटाला जोरदार धक्का बसला आहे. मनसेने महापालिका निवडणुकीत  ‘एकला चलो रे ‘चा नारा दिलेला आहे अशी माहिती मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिलीय.काही दिवसांपासून मनसे आणि शिंदे गटातील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने युतीच्या चर्चेला उधाण आले होते. मुंबई महापालिकेसाठी मनसे आणि शिंदे गट युती करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. 

दरम्यान, संदीप देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता आगामी सर्व पालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढणार आहे. मुंबईत २२७ जागांवर उमेदवार उभा करणार असल्याची माहितीदेखील संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

युती हा जर तरचा विषय आहे. आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. कुठल्याही पक्षाचा बालेकिल्ला नसतो. कार्यकर्त्यांमधे चैतन्य कायम ठेवण्यासाठी पालिका निवडणुक स्वबळावर लढणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. राज ठाकरेंच्या आदेशानुसार तयारीला सुरुवातदेखील केली असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.