पुण्यातील उद्धव ठाकरेंच्या बॅनरची चर्चा, कारण…

एकनाथ शिंदे यांनी केलेला बंड यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. खरी शिवसेना कोणाची, धनुष्य बाण निवडणूक चिन्ह कोणाचे, शिवाजी पार्कच्या मैदानावर कोणाच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळणार, यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.दरम्यान पुण्यात एका पोस्टरची खूप चर्चा होते आहे. गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार समोर आलाय. या पोस्टरवर उद्धव ठाकरे यांचा बॅनर असून त्यावर आनंद दिघे यांचा फोटो झळकल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. बॅनरच्या मध्यभागी उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे. त्याच्या वर ‘मा. उद्धवजी अखंड महाराष्ट्र सदैव आपणा सोबत’ असं लिहिलं आहे. उद्धव ठाकरेंच्या डाव्या बाजूला बाळासाहेब ठाकरे यांची छबी आहे. त्याखाली “माझा कट्टर शिवसैनिक आनंद दिघे” असे बाळासाहेब ठाकरे यांचे उद्गार लिहिण्यात आले आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या उजव्या बाजूला आनंद दिघे यांचा फोटो आहे. त्याखाली माझी जात गोत्र धर्म – फक्त शिवसेना हे आनंद दिघेंचे वाक्य लिहिण्यात आलंय.

बॅनरच्या खाली शिवसेना आमदार सचिन अहिर, आदित्य शिरोडकर, पृथ्वीराजदादा सुतार, अनिल बिडलान यांची नावं आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या वतीने देखील आनंद दिघे यांचा फोटो वापरत बॅनर लावला आहे. त्याची आता चर्चा होऊ लागलीय.

राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार आल्यापासून शिंदे गट वारंवार आनंद दिघे यांचे नाव वापरत आहे. शिवसेनेला मोठे खिंडार पडले असून अनेक शिवसेनेनेच आमदार शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटात वाद सुरू झाला. नेमकी शिवसेना कुणाची याबाबत आता खरी शिवसेना कुणाची याबाबत संघर्ष सुरू झाला आहे.

आनंद दिघे यांचे यांचे नाव वापरून शिंदे गट उदयाला आला अशा चर्चा झाल्या. धर्मवीर चित्रपटानंतर तर सर्व वातावरण निर्मिती झाली. मात्र आता शिवसेनेच्या बॅनरवर आनंद दिघे यांचा फोटो आल्याने राजकीय वातावरण तापायाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शिवसेने आता शिंदे गटाच्या वर्मावर बोट ठेवल्याच्या चर्चा देखील होऊ लागल्या आहेत. या बॅनरमुळे खरी शिवसेना कुणाची यावर चर्चा सुरू झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.