उद्धव ठाकरेंच्या अडचणी संपेनात ! ‘मशाल’ चिन्हावरही या पार्टीचा दावा

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रत्येक दिवस म्हणजे जणू काही संघर्षच असे म्हणायला हवे.आता खरंतर ठाकरे गटाला नवं चिन्ह आणि नाव मिळाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये जोश चढला होता पण आता अजून एक संकट ठाकरेंसमोर उभं राहीलेलं आहे. ठाकरे गटाला जे नवीन चिन्ह मिळालेलं आहे त्यावर समता पार्टीने दावा केलाय. मशाल चिन्ह आमचंच आहे असा दावा समता पार्टीच्या नेत्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मशाल चिन्ह १९९६ पासून आपल्याकडे असल्याचं सांगत समता पार्टीने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. दिवगंत नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीने मशाल चिन्हावर आपला दावा केलाय आणि रितसर निवडणूक आयोगाला ईमेल देखील केला आहे. एवढच नाही तर अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करणार असल्याची घोषणा देखील समता पार्टीकडून करण्यात आलेली आहे
समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जॉर्ज फर्नांडिस १९९४ मध्ये समता पार्टीची स्थापना केली होती. तर १९९६ मध्ये मशाल हे चिन्ह दिले होते. पुढे निवडणूक आयोगाने मशाल चिन्ह काढून घेतले असल्याचे सांगत ठाकरे गटालादिले. आता, निवडणूक आयोगाकडे मशाल चिन्ह मिळावे यासाठी ई-मेल केला असल्याचे देवळेकर यांना स्पष्ट केले आहे. मशाल चिन्हात साम्य असल्याने मतविभागणीची शक्यता आहे. त्यामुळेच मशाल चिन्ह इतरांना न देण्याची विनंती करण्यात आल्याचेही देवळेकरांनी सांगितले आहे.आता पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.