‘कोश्यारींना कोल्हापूरी जोडे दाखवण्याची वेळ आली आहे’

राज्यपाल भगतसिहं कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘कोश्यारींनी महाराष्टात राहून मराठीचा अपमान केला आहे. तीन वर्षे महाराष्ट्रात राहून सगळे ओरबाडले आहे. अशी माणसे महाराष्ट्राच्या नशिबात का येतात? त्यांना आता कोल्हापुरी जोडे दाखविण्याची वेळ आली आहे’ असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘राज्यपालांना विधानपरिषद जागा भरण्यात रस नाही. आज तर त्यांनी कहर केला आहे. ही मुंबई हक्काने मिळवलेली आहे. कोणी आंदण दिलेली नाही. मराठी माणसाच्या मनात त्यांनी आग लावलेली आहे. राज्यपाल हे मानाचं पद आहे त्या पदाचा अवमान करण्याची माझी इच्छा नाही पण कोश्यारींनी राज्यपालांच्या खुर्चीचा आब राखलेला नाही’ असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ‘तुम्हाला कल्पना आहे, मी मुख्यमंत्री असतानाही लॉकडाऊनमध्ये इतरत्र लोकांचे प्राण जात होते. तेव्हा राज्यपाल कोश्यारी यांना सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळ उघडण्याची घाई झाली होती. त्यावेळेला तो विषय मी वाढवला नव्हता. मध्यंतरी राज्यपालांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी विचित्र उद्गार काढले आणि आज मराठी माणासाचा अपमान केला’ याकडेसुद्धा उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

‘हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा गुन्हा राज्यपालांनी केला आहे. त्यांना नुसतं घरी पाठवायचे की तरुंगात पाठवायेच हा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे सगळीकडे संतापीच लाट उसळलेली आहे. मात्र त्यांच्या तोंडातलं वाक्य कोणाच्या पोटातून आलेलं आहे’ असा सवालही ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.