MPSC करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !

तुम्ही MPSC करताय तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पदभरतीच्या संख्येमध्ये वाढ केलेली आहे. MPSC च्या या वर्षीच्या परीक्षेत 340 पदांची भर पडलेली आहे. उपजिल्हाधिकारी आणि पोलीस उपअधीक्षक या पदांच्या संख्येत वाढ करण्यात आलेली आहे. एकूण ५०१ पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.MPSC कडून ११ मे रोजी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यात १६१ पदांचा समावेश होता मात्र आता अन्य पदांची मागणीपत्रे एमपीएससीला देण्यात आल्याने ही पदे राज्यसेवा 2022 च्या पदभरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. राज्यसेवा 2022 च्या जाहिरातीमध्ये केवळ 161 पदेच असल्याने स्पर्धा परीक्षार्थीकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संवर्गाची मिळून 340 पदे वाढल्याने एकूण 501 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल.

वाढलेल्या पदांमध्ये पोलीस उपअधीक्षक गट ‘अ’ संवर्गाची 41, उपजिल्हाधिकारी गट ‘अ’ संवर्गाची 33,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट ‘अ’ संवर्गाची 14, सहाय्यक राज्यकर आयुक्त गट ‘अ’ संवर्गाची 47, उपनिबंधक सहकारी संस्था गट ‘अ’ संवर्गाची दोन पदांची भरती वाढवण्यात आली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.