राज्यात ‘या’ तारखेपासून मुसळधार पाऊस !!

२३ जुलैपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू होणार अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने राज्याला झोडपायला सुरुवात केली होती. १५ ते २० दिवसांच्या कालावधीत राज्यात वीजेच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे राज्यात पूरस्थिती ओढावलेली आहे.
गेल्या आठवड्याभरात पावसाने थोडी विश्रांती घेतली होती मात्र हवामान खात्याकडून पुढच्या चार ते पाच दिवसात राज्यात मुसळधार पाऊस पडणारा असा इशारा देण्यात आलेला आहे. राज्यातील बहुतेक भागात पाऊस पडेल असे हवामान खात्याने सांगितलेले आहे. मराठवाडा, पश्चिम तसेच उत्तर महाराष्ट्र, विदर्भ येथे मेघगर्जनेसह पाऊस होणार असे सांगितलेले आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि शक्यतो घरात रहावे अशा सुचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.