आदिपुरुष चित्रपटाविरोधात राम कदम मैदानात, काय आहे भाजपचा आरोप?

‘आदिपुरुष’ प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला असून आता या वादात भाजपने उडी घेतली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटावर जोरदार टीका केली असून हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही. असे ट्वीट देखील राम कदम यांनी केले आहे. त्यांच्या या ट्वीटने अनेकांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. आदिपुरुष चित्रपटामध्ये देवदेवतांचं विडंबन करण्यात आलेले आहे असा आरोप राम कदम यांनी केलाय.

प्रसिद्धीसाठी आदिपुरुष चित्रपटात निर्मात्यांनी आपल्या देवी देवींचे विडंबन करुन कोट्यवधी हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. आता वेळ आली आहे त्यांनी माफीनामा द्यावा असेही राम कदम यांनी म्हटले आहे. तसेच जे लोक यासाठी जबाबदार आहेत, त्यांना इंडस्ट्रीमध्ये काही वर्षांसाठी बॅन केलं पाहिजे. जेणेकरून भविष्यात असे करण्याचे धाडस कोणी करणार नाही असंही राम कदम यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे.

जेव्हा आदिपुरुषचा टीझर रिलीज झाला होता तेव्हा नेटकऱ्यांनी चित्रपटाला ट्रोल करुन बॉयकॉट करा असे सांगितले होते. या चित्रपटात प्रभासने श्री रामाची, कृती सेननने सीतेची तर रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दरम्यान टीझरमधील VFX आणि सैफच्या लूकला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.