‘उद्धव ठाकरे यांनी पवित्र नात्याबद्दल केलेला उल्लेख..’ भावना गवळींचं टीकेला उत्तर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल नेस्को मैदानात केलेल्या भाषणात बंडकोर तसेच विरोधकांवर सडकून टीक केली. शिंदे गटातील खासदार भावना गवळी यांच्यावरही ठाकरे यांनी निशाणा साधला होता. भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधल्यावरुन गवळींवर टीका करण्यात आली होती त्यावर बोलताना भावना गवळी म्हणाल्या, काल मी त्यांची ताई होते, आज बाई झाले. रक्षाबंधन सारख्या पवित्र नात्याचं कुणीही राजकारण करु नये. मी मागील अनेक वर्षांपासून माझ्या मतदार संघातील एक लाखापेक्षा जास्त बांधवांना राख्या पाठवते, याआधीही मी अनेक मंत्री, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनाही राखी बांधलेली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मला संकटकाळी मदत केली म्हणून मी त्यांची साथ दिली, उद्धव साहेब नैराश्यातून अशी विधानं करत आहेत असे भावना गवळी यांनी स्पष्ट केले. 

मला पंतप्रधानांचं आश्चर्य वाटतं, स्वतःच्याच पक्षातील माणसांनी ज्या महिला खासदारावर आरोप केलेत, भ्रष्टाचारी म्हणून आरोप केलेत, तुम्हाला या सव्वा-दीडशे कोटी लोकसंख्येमध्ये हीच बहीण मिळाली राखी बांधायला? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या भाषणात केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.