कंगनाच्या Emergency मध्ये ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री !

कंगनाच्या Emergency सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आणीबाणी ही देशातील सर्वात मोठी घटना या चित्रपटाद्वारे सगळ्यांसमोर येते आहे. आपल्याला माहितच आहे या चित्रपटात कंगना भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भुमिका साकारते आहे. जेव्हा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा त्याची सगळीकडे खूप चर्चा करण्यात आली. त्यानंतर एक एक व्यक्तीमत्व आणि कलाकारांचा लूक रिलीज करण्यात येतोय. आज सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्त्या आणि लेखिका पुपुल जयकर यांची भूमिका या चित्रपटात असून ती साकारली आहे अभिनेत्री महिमा चौधरीने !
खूप कालावधीनंतर महिमा चौधरीला आपण मोठ्या पडद्यावर पाहणार आहोत. कंगनाच्या Emergency सिनेमाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. या आधी अभिनेता अनुपम खेर यांचा लूक रिलीज करण्यात आला होतो ते दिवंगत राजकारणी जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारत आहेत. भाजपनेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका अभिनेता श्रेयस तळपदे साकरत आहे तर आता क्रांतीकारी लेखिका पुपुल जयकर यांची एंट्री झालेली आहे. ही भूमिका अभिनेत्री महिमा चौधरी साकारणार आहे.
कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केलं असून त्याकाळी घडलेल्या सर्व घटनांची महत्त्वाची साक्षीदार म्हणजे आयर्न लेडी पुपुल जयकर असे कंगनाने लिहीले आहे. महिमा चौधरीनेही एक पोस्ट शेअर करून कंगनाचे आभार मानलेले आहेत. एका दिग्गज व्यक्तीमत्वाची भूमिका साकारताना खूप आनंद होत असून ही जबाबदारी माझ्यावर सोपविल्याबदद्ल तुझे आभार असे ही महिमाने म्हटले आहे.