मोदी-शाह नव्हे,’यांच्या’मुळे झालो मुख्यमंत्री; CM शिंदेंचा चर्चेला पूर्णविराम

शिवसेनेत अनेक बंड झाले पण एकनाथ शिंदे यांनी केलेला बंड फक्त शिवसेनेसाठी नाही तर राज्यासाठीसुद्धा ऐतिहासिक असाच होता. त्यानंतर देशात एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली. शिंदेंच्या बंडामुळे मविआ सरकार कोसळलं आणि भाजपसोबत हातमिळवणी करुन शिंदे सरकार राज्यात आलं. दरम्यान शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ मोदी- शाह यांच्यामुळेच पडली अशी चर्चा होती, अजूनही असेच बोलले जाते पण ते खरे नाही. कारण नाशिकच्या कार्यक्रमात बोलताना आज मुख्यमंत्री शिंदेंनी याचा खुलासा केला.
नाशिक येथे आयोजित स्वामीनारायण मंदिर वेदोक्त मूर्तीप्रतिष्ठाविधी समारंभातून लाईव्ह https://t.co/HHAoJSqkht
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 28, 2022
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्याचा मुख्यमंत्री होण्यामागे मला ज्यांचा आशिर्वाद मिळाला ते आहेत स्वामी नारायणजी ! यावेळी शिंदेंनी एक जुनी आठवण सांगितली. ते म्हणाले की, मी ११ नोव्हेंबर २०१७मध्ये येथे आलो होतो. त्यावेळी शिलान्यास भूमीपूजन झाले होते. त्यानंतर आज याच ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून उद्घाटन करण्याची संधी मिळाली आहे. हे माझं भाग्य असून, मी मुख्यमंत्री झालो, हा स्वामी नारायणजींचा आशीर्वाद आहे. त्यामुळे मी सर्व लोकांना धन्यवाद देऊ इच्छितो असेही शिंदेंनी सांगितले. त्यामुळे सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यामागे मोदी शाहांचा हात असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे.