ड्रायफ्रूट्स भिजवून का खातात? वाचा मलायका अरोरा काय सांगतेय…

ड्रायफ्रूट्स भिजवून खाणे हे आरोग्यासाठी उत्तम आहे.आपल्यासाठी ड्रायफ्रूट्स म्हणजे वरदान आहे. त्यातीव पोषक तत्त्वं आणि औषधी गुणधर्मांमुळे डाएटबाबत जागरुक असणाऱ्या प्रत्येकाच्या आहारात त्यांचा समावेश असतो. प्रत्येकजण वेगवेगळ्या वेळी त्यांचं सेवन करत असतात. ड्रायफ्रूट्स खाण्याचा जास्तीत जास्त फायदा करुन घेण्यासाठी ते भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. फिटनेस आयकॉन मलायका अरोरानं नुकतीच याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. ड्रायफ्रूट्स भिजवून खाण्याचे काय फायदे होतात, हे तिने सांगितलं आहे.
रात्रीच्या वेळी ड्रायफ्रूट्स भिजवून ठेवले आणि सकाळी ते खाल्ले तर शरीरातील उष्णता नियंत्रित होण्यास मदत होत असल्याचं दिसून आलंय.शरीरातील उष्णता वाढू नये यासाठी आपण नेहमी जागरुक असतो. जर ड्रायफ्रूट्स पाण्यात भिजवून खाल्ले तर शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहण्यासही मदत होते.
भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाण्यामुळे पचनाशी संबंधित विकार दूर होण्यासही मदत होते.विशेषतः फाएटिक ॲसिड वाढल्यामुळे ज्या ज्या समस्या उद्भवतात, त्या ड्रायफ्रूट्सच्या सेवनामुळे कमी होण्यास मदत होते. त्याशिवाय अपचन, गॅस, ढेकर येणे यासारख्या विकारांपासून आराम मिळायला नियमित ड्रायफ्रूट्सनं सेवन फायदेशीर ठरतं.
भिजवून खाण्यामुळे ड्रायफ्रूट्समध्ये असणारे लोह, कॅल्शिअम, प्रोटिन यासारखे पोषक घटक ही अधिक सहजपणे शरीरात शोषले जातात. तसेच भिजवलेले ड्रायफ्रूट्स चवीला उत्तम लागतात आणि खायलाही सोपे पडतात. पटकन चावले जातात आणि पचनासाठीही हलके होतात.