सावधान ! दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला

कोरोना भारतातून हद्दपार झालेला नाही तोपर्यंत भारतात मंकिपॉक्सचा शिरकाव झालेला आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला आहे अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जो व्यक्ती मंकिपॉक्सचा रुग्ण आहे त्याने परदेश प्रवास केलेला नाही. या रुग्णाला दिल्लीच्या मौलाना आझाद मेडिकल कॉलजेमध्ये दाखल करण्यात आलंय. आरोग्य मंत्रालयाच्या वतीने ही माहिती देण्यात आलीय.
जो रुग्ण मंकीपॉक्स पॉझिटीव्ह आहे त्याचे वय साधारण ३१ वर्षे आहे. त्याला ताप असून त्याच्या शरीरावर जखमा झालेल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीला ताप होता. तसेच चेहऱ्यावर जखमा होत्या.त्यामुळे त्याची मंकीपॉक्सची टेस्ट करण्यात आली. यात तो रुग्ण पॉझिटीव्ह आढळला.दिल्लीत मंकीपॉक्सची ही पहिलीच केस असल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.