अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा चर्चेत…कारण

मराठी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. खरंतर ती नेहमीच चर्चेत असते. तिच्या एका फेसबूक पोस्टमुळे तिला तब्बव ४१ दिवस तुरुंगात जावे लागले होते. तिच्याविरोधात राज्यभरातून २२ एफआयआर आले होते. आता पुन्हा केतकी चितळे चर्चेत येण्यामागचे कारण म्हणजे केतकीने पुन्हा फेसबक पोस्ट शेअर केली आहे. पुन्हा एकदा तिला फेसबुकचा ॲक्सेस मिळालेला आहे.तेव्हा तिने फेसबुकवरुनच पोस्ट करत याविषयी आनंद व्यक्त केलाय.

फेसबुक पोस्टवरुन केतकीने म्हटले आहे,अखेर मला माझ्या फेसबुकचा ॲक्सेस परत मिळाला आहे; निदात तात्पुरता तरी. Lol’. केतकीची पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतेय. १३ मे रोजी केतकीने शरद पवारांविषयी पोस्ट केली होती त्यानंतर तिची लेटेस्ट पोस्ट आज म्हणजे २९ ऑगस्ट २०२२ रोजी आलेली आहे. केतकीच्या या पोस्टवर शेकडो लाइक्स आले आहेत. तिच्या फेसबुकवर, तिच्या सोशल मीडियावर सायबर वॉच असेल अशीही चर्चा सध्या सुरू झाली आहे.आता अभिनेत्री काय नवी पोस्ट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.