ना गाजावाजा ,ना दिखावा ! मराठी अभिनेत्रीनं गुपचूप केलं लग्न

सेलिब्रिटी मग ते मराठी सिनेनाट्य किंवा मालिकेतील असो वा हिंदीमधील असो त्याचा एक खास गाजावाजा केला जातो. अगदी काही सेलिब्रिटींनी आपला विवाहसोहळा ओटीटीवर दाखवण्याचा ट्रेंडसुद्धा सुरु केला आहेत पण एका मराठी अभिनेत्रीने मात्र गुपचुप विवाह केला आणि त्याचा कुठेही गाजावाजा केलेला नाही. त्या अभिनेत्रीचे नाव आहे नेहा जोशी. तिने सोशल मीडियावर विवाहाचा फोटो शेअर केला आहे. नाटक, मालिका, सिनेमात आपण नेहाला पाहिलेले आहे. कोणताही बडेजाव किंवा गाजावाजा न करता नेहाने ओमकार कुलकर्णीसोबत लग्नगाठ बांधलेली आहे. या नवदाम्पत्यावर आता शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
‘वाडा चिरेबंदी’, ‘बेचकी’, ‘कनुप्रिया’ आदी नाटकं आणि ‘झेंडा’, ‘पोश्टर बॉइज’, ‘लालबागची राणी’, ‘बघतोस काय मुजरा कर,’ या सिनेमातून आपण नेहाचा अभिनय पाहिला आहे. ‘का रे दुरावा’ मालिका असो वा ‘वाडा चिरेबंदी’ नाटक प्रत्येक भूमिकेतून नेहाने आपली छाप पाडलेली आहे. मालिका-सिनेमे आणि नाट्यवर्तुळात नेहा चांगलीच लोकप्रिय आहे.