टाटा नेक्सॉनला टाकले मागे, ‘ही’ गाडी ठरली नंबर वन!!

देशात गेल्या काही महिन्यात अनेक गाड्या लाँच झाल्या. ग्राहकांना गाडीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले.वर्ष २०२२मध्ये कार उत्पादक कंपन्यांनी एकूण १४,८६,३०९ गाड्या विकल्या आहेत. मात्र गाड्यांच्या विक्रिमध्ये सर्वाधिक विक्री झालेली गाडी कोणती आहे माहित आहे का? ती आहे मारुति कंपनीची ‘वॅगनआर गाडी’. या गाडीच्या १,१३,४०७ युनिट्सची विक्री झालेली आहे. सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाडीमध्ये ‘वॅगनआर गाडी’ने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मारुतीची वॅगनआर हॅचबॅक १.० लीटर आणि १.२ लीटर पेट्रोल इंजीनसह येते. या गाडीची किंमत ५. ४७ लाख ते ७.२० लाखांच्या दरम्यान आहे.
गेल्या सहा महिन्यात कार उत्पाद कंपन्यांनी १४,८६,३०९ वाहनांची विक्री केली. २०२१ वर्षाच्या तुलनेत पाहता यंदा विक्रीमध्ये १७.५१ % वाढ झाली होती. ग्राहकांनी ‘वॅगनआर गाडी’ला पसंती दिल्यामुळे यंदा या गाडीच्या १,१३,४०७ युनिट्स विकल्या गेल्या. मागच्या वर्षीच्या तुलनेत ‘वॅगनआर गाडी’ची विक्री १९.५८ % वाढलेली पहायला मिळते आहे. टॉप १० कारमध्ये मारुति कंपनीच्या सात वाहनांचा पहिल्या सातमध्ये समावेश आहे. मारुति स्विफ्ट हॅचबॅक दुसऱ्या क्रमांकावर तर डिझायर कॉम्पॅक्ट सेडानने तिसरे स्थान पटकावले आहे. टाटाची नेक्सॉन सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही चौथ्या क्रमांकावर आहे. यंदा ८२,७७० नेक्सॉन सब कॉम्पॅक्ट गाड्यांची विक्री झालेली आहे.