KBC 14 : ७५ लाखांच्या ‘या’ प्रश्नावर मेकॅनिकल इंजिनीअरने सोडला खेळ; तुम्हाला उत्तर माहितीये का?

ऑगस्ट महिन्यापासून कौन बनेगा करोडपती या मालिकेचे नवे पर्व सुरु झाले. सध्या सोशल मीडियावर या मालिकेमधील एका भागाचा प्रोमो पोस्ट करण्यात आलेला आहे. अमिताभ यांच्यासमोरच्या हॉटसीटवर करण इंद्रसिंह ठाकोर नावाची एक व्यक्ती बसली अशून ती पटापट उत्तर देताना दिसते आहे. बच्चनजी सुद्धा त्याला शाब्बासकी देत आहेत. इंद्रसिंह ठाकोरने ५० लाख जिंकले आहेत पण ७५ लाखांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर न देता आल्याने त्याने खेळातून माघार घेतली.
५० लाखांसाठी “प्रसिद्ध डिझाइनर्स चार्ल्स आणि रे एम्स यांनी भारत भेटीदरम्यान दैनंदिन वापरातल्या कोणत्या गोष्टीचे वर्णन ‘द ग्रेटेस्ट, द मोस्ट ब्यूटीफुल’ असे केले होते” हा प्रश्न करण ठाकोरला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे ‘लोटा’ हे अचूक उत्तर देत त्याने ५० लाख रुपये कमावले होते. त्यानंतर करण ठाकोरला विचारण्यात आले यापैकी कोणाला त्यांच्या कामासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले, जे नंतर चुकीचे असल्याचे सिद्ध झाले? त्यासाठी ओसवल्ड एव्हरी, जोशिया गिब्स, गिल्बर्ट एन लुईस, जोहान्स फिबिगर पण या प्रश्नाचे उत्तर येत नसल्याने त्यांने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. याचे उत्तर ‘जोहान्स फिबिगर’ हे आहे.