MPSC वाली मुले गोविंदा पथक जॉइन करणार ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत एक महत्त्वाची घोषणा केली. त्याची सगळीकडे चर्चा होते आहे.दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देवून आता दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश करण्यात आलेला आहे. तसेच या खेळात सहभागी गोविंदांना शासकीय योजनांचा लाभही मिळणार आहे.विशेष म्हणजे शासकीय नोकऱ्यांमध्ये ५ टक्के आरक्षण असेल अशी घोषणा करण्यात आली. या घोषणेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते आहे.विद्यार्थ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात इंटरनेटवर मिम्सचा पाऊस पडतो आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येतेय.अनेक मीम्स याबाबत व्हायरल झाले आहेत. त्यात एमपीएससी करणारे विद्यार्थी गोविंदा पथक जॉइन करणार असल्याचे सांगण्यात येते आहे. व्हायरल मीम्समध्ये अभिनेता गोविंदाचा फोटो लावून हे आमचे सरकार आहे असे म्हटले आहे. एका व्हायरल मीम्समध्ये गोट्या खेळणाऱ्या पोरांना नोकरीत २ टक्के आरक्षण मिळणार अशी न्यूज ब्रेक करण्यात येते आहे.
तर एका मीम्समध्ये सुरपारंबी खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असे दिसते आहे.एका मीम्समध्ये सरकारी नोकरी मिळण्यासाठी दोनच मार्ग, स्पर्धा परिक्षांची तयारी करणे किंवा गोविंदा पथक जॉईन करणे असे दिसते आहे. फेसबूक, ट्विटरवर नेटकरी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर टीकेची झोड उठवताना दिसत आहेत.