सायरस मिस्त्रीच्या अपघाताचे पडसाद थेट जर्मनीत !

प्रसिद्ध उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनामुळे उद्योगविश्वात मोठी खळबळ उडालीय. या अपघाताचा धसका मर्सिडीज बेंझ कंपनीनेदेखील घेतला आहे. मर्सिडीज बेंझचे हेडक्वार्टर असलेल्या जर्मनीने या अपघाताच्या चौकशीत लक्ष घातलंय.
मर्सिडीजने या अपघाताची माहिती गोळा करण्यास सुरुवात केलीय. कारमध्ये एक चिप लावलेली असते, ती कंपनीने आपल्या ताब्यात घेऊन जर्मनीला पाठविली आहे. जर्मनीच्या मुख्यालयात या चिपमधील डेटाचे विश्लेषण केले जाणार आहे. हा अपघात कसा झाला आणि सात एअरबॅग असूनही तीनच कशा उघडल्या याचाही तपास केला जाणार आहे. आम्ही ग्राहकांच्या गोपनीयतेचा आदर करणारा एक जबाबदार ब्रँड आहोत. आमची टीम शक्य असेल तेथे पोलीस अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहे. त्यांना आम्ही थेट उत्तर देऊ. सायरस मिस्त्री आणि जहांगीर पांडोले यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे, असे मर्सिडीजने म्हटलंय.
पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील म्हणाले की, “वाहनाची सर्व माहिती नोंदवणारी ही चिप विश्लेषणासाठी जर्मनीला नेण्यात येणार आहे. आठवड्याच्या अखेरीस त्याचा अहवाल येण्याची आम्हाला अपेक्षा आहे.”
अपघाताच्या कारणाचे विश्लेषण करण्यासाठी डेटा डिक्रिप्ट केला जाईल. टायर प्रेशर, ब्रेक फ्लुइड, वेग, काही बिघाड, स्टीयरिंग व्हील कंडिशन, सीटबेल्ट आणि कारची एअरबॅग कंडिशन यांसारख्या गोष्टी देखील कंपनी तपासणार आहे.
महाराष्ट्रात या काळात दोन अति महत्वाचे सुपुत्र काळाच्या पडदा आड गेलेत. परमेश्वर त्याच्या कुटुंबास शक्ती देवो. मला असे नमूद करावेसे वाटते कि गाडी चालवणारे जे पण कोणी असतील त्यांनी आपल्या गाडीत अति महत्वाची व्यक्ती आहे याचे भान असायला हवे. एक तर त्यांनी स्वतःहून आपले लायसन जमा करावे किंवा त्या बाजूने पण सरकारने विचार करावा.