कसा झाला सायरस मिस्त्री यांचा अपघात? मर्सिडीजकडून प्राथमिक अहवाल सादर

टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्यानंतर मर्सिडीजने पालघर पोलिसांकडे चौकशी अहवाल सोपवलाय. मर्सिडीजने आपल्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, कार ताशी १०० किमी वेगाने धावत होती. तसंच अपघाताच्या पाच सेकंद आधी ब्रेक दाबवण्यात आला होता. यावेळी कारचा वेग ताशी १०० किमी इतका होता. अनहिता पंडोले यांनी ब्रेक दाबला तेव्हा कारचा वेग ताशी ८९ किमी वर पोहोचला आणि पुलाला धडक दिली.

पोलिसांनी मर्सिडीज कंपनीकडे अनहिता पंडोले यांनी कार ताशी १०० किमी वेगात असताना ब्रेक दाबला की त्याच्याआधीच दाबला होता अशी विचारणा केली होती. तसंच किती वेळा ब्रेक दाबवण्यात आला होता असंही विचारण्यात आलं होतं.

पुढील माहिती मिळवण्यासाठी, मर्सिडीज कंपनी १० सप्टेंबरला अपघातग्रस्त कार १२ सप्टेंबरला शोरुममध्ये घेऊन जाणार आहे. हाँगकाँगमधील एक पथक येऊन या कारची पाहणी करणार असून, त्यानंतर सविस्तर चौकशी अहवाल सोपवला जाईल. हाँगकाँमधील पथकाने व्हिसासाठी अर्ज केला आहे. जर पुढील ४८ तासात व्हिसा मिळाला नाही, तर भारतातील टीम या वाहनाची पाहणी करुन अहवाल सादर करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.