आधी भरती, आता निरोप ! Metaचा ११ हजार कर्मचाऱ्यांना नारळ, नोकरी गमावलेल्या लोकांचे काय होणार?

ट्विटरमध्ये कर्मचारी कपात झाल्यानंतर मेटानेसुद्धा तब्बव ११ हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय. बुधवारी यासंदर्भाच अधिकृत घोषणा करण्यात आली. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी नोकरकपात असून ‘मेटा’मधील कर्मचाऱ्यांची सप्टेंबर अखेरपर्यंतची संख्या ८७ हजार होती. इतर कंपन्यांप्रमाणे मेटाने देखील कर्मचारी कपातीचा मार्ग स्विकारलेला आहे. मेटामध्ये एकूण ८७,००० कर्मचारी कार्यरत होते त्यातील ११ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आलाय.फेसबुकसह व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामच्या कर्मचाऱ्यांनाही नारळ देण्यात येतोय.फेसबूकच्या इतिहासीतील कर्मचारी कपातीचा हा मोठा निर्णय आहे.
दरम्यान ‘मेटा’कडून करण्यात येत असलेल्या नोकरकपातीचा फटका H1बी व्हिसाधारकांनाही बसण्याची शक्यता आहे. त्यांना मेटाकडून मदत करण्यात येणार आहे. मार्क झुकरबर्ग यांनी मंगळवारी कर्मचाऱ्यांना या टाळेबंदीची माहिती दिली. कंपनीमधून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना चार महिन्यांचा पगार देण्यात येणार आहे.तसेच या कर्मचाऱ्यांना १६ आठवड्यांचे मूळ वेतन, प्रत्येक वर्षासाठी दोन अतिरिक्त आठवड्यांचे वेतन जे कंपनीत योगदान दिलेल्या दिले जाते ते मिळणार आहे. तसेच कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आरोग्य विमा आणखी सहा महिने सुरू राहील असे मार्क यांनी सांगितले आहे.
२०२०, २०२१ या काळामध्ये कंपनीने २७ हजार कर्मचाऱ्यांची भरती केली आणि या वर्षीच्या पहिल्या नऊ महिन्यांत १५,३४४ लोकांना कामावर ठेवण्यात आले. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी एका ब्लॉग पोस्टमधून असे सांगितले आहे मेटाच्या इतिहासातील सर्वात कठीण बदल सामायिक करत आहे. मी माझ्या टीमचा आकार सुमारे १३ टक्क्यांनी कमी करण्याचा आणि आमच्या ११,००० हून अधिक प्रतिभावान कर्मचाऱ्यांना कंपनीमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय.