काय झाडी, काय डोंगर….उलगडेल बंडखोरांचं रहस्य

राजकारणात कधी काय होईल हे कोणालाच माहित नाही. शिंदे गटाने दिलेलं धक्कातंत्र आणि महाविकास आघाडीचा झालेला पायउतार याचा विचार कोणीच कधी केला नव्हता. हेच सत्तानाट्य आता वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मी पुन्हा येईन हे वाक्य राजकारणात खूप गाजलं ते एवढं गाजलं की आजही सोशल मीडियावर त्याची चर्चा होते. याच नावाने म्हणजे मी पुन्हा येईन या नावानेच नवीन वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. त्याचा ट्रेलर नुकताच शेअर करण्यात आला आहे. 

मी पुन्हा येईन या वेबसिरीचे लेखन आणि दिग्दर्शन अरविंद जगताप यांनी केले आहे. तर सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिता जाधव, सीमा कुलकर्णी आणि दीप्ती क्षीरसागर असे दमदार कलाकार यात आपल्याला दिसणार आहेत. 

आमदारांची पळवापळवी, बहुमतासाठी धडपड, नेत्यांची कारस्थानं कोणत्या थरावर जावू शकतात याचे गमतीशीर चित्रण या वेबसिरीजमध्ये पहायला मिळणार आहेत. मी पुन्हा येईन ही राजकारणावर भाष्य करणारी वेबसिरीज जरी असली तरी त्याचा वास्तावाशी काही संबंध नाही असे अरविंद जगताप यांनी स्पष्ट केले आहे. हे एक राजकीय व्यंग किंवा आपण म्हणूया हा राजकीय धुळवडीचा एक रंग आहे. मी पुन्हा येईन ही वेबसिरीज पाहताना काही गोष्टी खऱ्या वाटतील पण तो निव्वळ योगायोग समजावा.राजकारणात काहीच खरं नाही हे सांगणारी ही वेबसिरीज आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.