गोव्यात नौदलाच्या विमानाचा अपघात, जीवित हानी नाही…

गोव्यातील किनारपट्टी भागात भारतीय नौसेनेचे २९ के हे मिग विमान अरबी समुद्रात अपघातग्रस्त झाल्याची बातमी समोर आली आहे. हे विमान पुन्हा माघारी येत असताना त्यामध्ये नादुरुस्ती झाल्याने ही दुर्घटना घडल्याचं समजलं आहे. हा अपघात होऊनही वैमानिक बचावला असून कोणत्याही जीवितहानी झाली नसल्याचं नौसेनेने जाहीर केलेलं आहे. गोव्याच्या किनारी क्षेत्रात या विमानांचा सातत्याने सराव होत असतो तो संपवून पुन्हा येताना या मिग विमानाचा यांत्रिक नादुरुस्तीमुळे असा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला गेला आहे.
विमानातील यंत्रणा बिघडल्याचं समजताच पायलटने त्वरित समुद्रात बुडी मारली. नौसेनेला या दुर्घटनेची चाहूल लागताच या वैमानिकाला वाचवण्यासाठी लगेचच कामाला लागली व त्याला परत आणले. हा वैमानिक आता पूर्णतः सुखरूप आहे, अशी माहिती मिळत आहे. पण या अपघातामागची काय कारणे आहेत? याची लवकरच सखोल चौकशी होणार असल्याचं वृत्त आहे.