मिलिंद नार्वेकरांची पोस्ट, रश्मी ठाकरेंचा फोटो, काय म्हणाले?

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आणि चढाओढ सुरु झाली ठाकरे गटाकडे कोण आणि शिंदे गटाकडे कोण प्रत्येक पावलावर दोन्ही गट एकमेकांना मात देण्यासाठी लढत आहेत असेच दिसते आहे. असा वातावरणात वेगवेगळे आमदार, मंत्री, खासदार यांच्या नावाची चर्चा असतेच पण एक व्यक्ती अशी आहे जी आमदार-खासदार नाही पण सध्या तिच्या भोवती राजकारण फिरतय असंच वाटत आहे. ती व्यक्ती म्हणजे मिलिंद नार्वेकर जे  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आहे. शिवसेनेत होणारी प्रत्येक हालचाल अगदी उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही नार्वेकर यांचीची मदत घ्यावी लागते. ठाकरे कुटुंबाबरोबर नार्वेकरांची घनिष्ट संबंध आहेत. 

 उद्धव ठाकरे यांचा राजकारणातील सुरुवातीच्या काळापासून नार्वेकर उद्धव यांच्याबरोबर सावली सारखे आहेत. पण जेव्हा शिवसेनेच फूट पडली तेव्हा ठाकरेंच्या बाजून कोण आणि शिंदेंच्या बाजूने कोण हाच मोठा प्रश्न होता. आता तसं पाहिलं तर चाळीसहून अधिक आमदार, बाराहून अधिक खासदार काही माजी नगरसेवक आणि शेकडो पदाधिकारी शिंदे यांच्या बाजूने केले आहेत. आता हे सगळं होत असताना मिलींद नार्वेकर नेमक्या कोणाच्या गटात आहेत. याचे अधिकृत समोर आलेले नसले तरी शिवसेनेच्या पडत्या काळात नार्वेकरांनी उद्धव ठाकरे यांची साथ कायम ठेवली. 

पण चर्चेची ठिणगी पडली जेव्हा मुख्यमंत्री शिंदे नार्वेकरांच्या घरी गणपतीला गेला. एवढेच नाही तर शिंदेंना घेवून ते मनोहर जोशी यांच्या घरीसुद्धा गेले त्यामुळे मिलींद नार्वेकर नक्की कोणाच्या बाजून आहेत अशी चर्चा रंगू लागली.  दरम्यान मधल्या काळात मिलिंद नार्वेकर यांनी शेअर केलेल्या पोस्टची जोरदार चर्चा झाली. त्यात विश्वविख्यात तिरुमला तिरुपती देवस्थानच्या विश्वस्त पदी नेमणूक होऊन आज एक वर्ष पूर्ण झालं. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला बद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांचे मनापासून आभार मानतो असं त्यांनी लिहीलं होतं.

२३ सप्टेंबरला उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा वाढदिवस होता तेव्हासुद्धा नार्वेकरांनी पोस्ट शेअर करत, तमाम शिवसैनिकांच्या आधारस्तंभ माँसाहेबांची सावली सौ. रश्मी वहिनी उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा असे म्हटले होते. एक ग्रुप फोटो त्यांनी शेअर केलाय. एकीकडे शिंदे गटात जाण्याच्या चर्चांना उधाण तर दुसरीकडे ठाकरे कुटुंबीयांची असलेलं नातं यामुळे नार्वेकरांचा नाव नेहमी चर्चेत असतं आता येणाऱ्या काळात नार्वेकर काय करणार ते समजेलच. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.