शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चा जोरात, मिलिंद नार्वेकर म्हणतात,

शिंदे गटात इनकमिंग सुरुच आहे त्यात दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर द्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात सहभागी होतील असा दावा करण्यात येतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर राज्यात तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे. सध्या एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे मिलींद नार्वेकर कुठे दिसत नाहीत ते कुठे गेले. गोरेगाव येथे झालेल्या गटप्रमुख मेळाव्यातसुद्धा ते नव्हते त्यामुळे चर्चांना जास्तच उधाण आलेलं आहे.
आता या चर्चा सुरु असताना स्वतः मिलिंद नार्वेकरांनी यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात श्री व्यंकटेश्वरा स्वामी मंदिरातील गरुड वाहन पुजेचा साक्षीदार होता आलं. याबद्दल त्यांनी स्वतःला भाग्यवान म्हटल आहे.
Blessed to witness the auspicious Garuda Vahanam on the 5th day of Brahmotsavam with Hon. Chief Justice of India Shri. Uday Lalit ji, Maharashtra Advocate General Shri. Ashutosh Kumbhakoni ji & @TTDevasthanams Chairman Shri. @yvsubbareddymp ji at Sri Venkateswara Swamy Temple pic.twitter.com/52xbWNkbjS
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) October 1, 2022
आता या ट्विटनंतर मिलींद नार्वेकर कुठे आहेत ते सगळ्यांना समजलेले आहे पण ते दसऱ्याला शिंदे गटात जाणार का ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचे मानले जातात जर ते एकनाथ शिंदेंसोबत गेले तर ठाकरेंना मोठा धक्का बसू शकतो. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील अशी आशा आहे.