आमचं चिन्ह… मिलिंद नार्वेकरांचं लक्षवेधी ट्विट; धनुष्यबाण गोठवल्यानंतर ठाकरे गटाचं ठरलं?

शनिवारी रात्री निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवण्याचा अंतरिम निर्णय जाहीर केला. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे असे म्हटले जातेय.शिंदे यांनी केलेल्या बंडातून नव्याने उभारी घेऊ पाहत असलेल्या शिवसेनेसाठी आता कसोटीचा काळ आहे. पण त्याचबरोबर शिंदे यांनासुद्धा निवडणूक आयोगाने धक्का दिला असून शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही असे निवडणूक आयोगाने निर्णय देताना म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एक पोस्ट करत जिंकून दाखवणारच असे सांगत आपला इरादा काय आहे ते सांगितले आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय, खास असे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी निवडणूक चिन्हाबद्दल एक सूचक ट्विट केलं आहे. त्या ट्विटची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी आमचं चिन्ह श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे असं म्हटलं आहे. यासोबत त्यांनी वाघाचा एक फोटो ट्विट केलाय. शिवसेनेच्या पोस्टरवर डरकाळी फोडणारा वाघ पाहायला मिळतो. मात्र नार्वेकरांनी ट्विट केलेल्या फोटोत दिसणारा वाघ वेगळा आहे.
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) October 8, 2022
दरम्यान युवासेना नेते आदित्य ठाकरेंनी यांनी इन्स्टावर हरिवंशराय बच्चन यांची प्रसिद्ध कविता पोस्ट केलेली आहे. एकणूच ठाकरे पिता-पुत्र जोरदार संघर्ष करण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसत आहे.