मंत्रिपद आमचा हक्क – बच्चू कडू

अखेर शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार आज होतो आहे. एकूण १८ मंत्री शपथ घेणार आहेत. दरम्यान शिंदे गटातील एका आमदाराला मंत्रिपद नको असे म्हटले जाते आहे. तर मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी आमदार बच्चू कडू यांनी ‘मंत्रिपद हा आमचा हक्कच’ असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

‘महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आम्ही आग्रही राहू. मंत्रिपद हा आमचा हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच यात शंका नाही असे बच्चू कडू यांनी सांगितले आहे. शिंदे सरकार मित्र पक्ष आणि अपक्षांशिवाय राहू शकत नाही त्याचा विचार व्हावा’ असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अपक्ष आमदार बच्चू कडू बोतलत होते. 

‘राजकारणात काही गोष्टी उघडपणे सांगितल्या जात नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला शब्द दिला आहे. येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात नक्की स्थान मिळेल. आम्ही शब्द दिलाय असं त्यांनी सांगितलं आहे.आथा काही तांत्रिक कारणं असतील आणि राजकारणात काही पावलं मागे घेणं, पुढे जाणं आणि त्याग करणं महत्त्वाचं असतं याशिवाय राजकारम मजबूत होत नाही. आम्हाला हे माहित असून आपल्या शब्दावर ते ठाम राहतील.’ असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.