आमदार शिरसाट यांनी बिल्डरला धमकावले, गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप…

शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. शिरसाट यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायाधीशांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांचे टेंडर भरू नको, अन्यथा तुला ठार मारू, अशा प्रकारची धमकी दिल्याचा आरोप अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत केलेला आहे.
संजय शिरसाट यांनी बाबा कंस्ट्रक्शन्स या बांधकाम क्षेत्रातील कंपनीला धमकावले आहे, असा आरोप सदावर्ते यांनी केला आहे. विशेष म्हणजे या धमकीप्रकरणाशी निगडित एक कॉल रेकॉर्डिंग त्यांच्याकडे असल्याचा दावाही सदावर्ते यांनी केलेला आहे.
सदावर्ते म्हणाले, औरंगाबादेतील स्नेहनगर भागात मुंबईच हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायाधिशांच्या निवासस्थानासाठी ४७ कोटी रुपये खर्चून दहा मजली इमारत बांधण्यात येत आहे.या बांधकामासाठी टेंडर प्रक्रिया सुरू असतांनाच संजय शिरसाट यांनी आपल्या सहाय्यकामार्फत आमचे अशिल बाबा कन्स्ट्रक्शन अॅंन्ड इंजिनिअरिंग कंपनी यांना टेंडर भरू नका, अन्यथा तुम्हाला महागात पडले अशी धमकी दिली असे सदावर्ते म्हणालेत.