महाराष्ट्रात पुन्हा सत्ता परिवर्तन होणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. ‘शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला कधी दिल्लीत जावं लागलं नाही. दिल्लीचे नेते मुंबईत येवून चर्चा करत होते. मात्र आता मुख्यमंत्री सतत दिल्लीला जात असतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा मुक्काम दिल्लीत हलवणार का?’ असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे असे संजय राऊत म्हणालेत. 

‘मुख्यमंत्रीपद सांभाळून महिना झाला तरी अद्याप मंत्रिमंडळ स्थापन झालेलं नाही. राज्याच्या राजकारणाचा खेळखंडोबा झाला असून शिवसेनेतून बाहेर पडून बंडखोर आमदारांनी नक्की काय मिळवलं हा एक चिंतनाचा विषय आहे. कोणत्याही परिस्थितीत सुप्रीम कोर्ट संविधानाच्या विरोधात जाणार नाही त्यामुळे निकाल आमच्या बाजूने लागेल. ते सोळा आमदार दहाव्या शेड्युलनुसार अपात्रच ठरणार आहे. मग अशावेळी या आमदारांना दुसऱ्या पक्षाता स्वतःला विलीन केल्याशिवाय कोणताच पर्याय उरणार नाही. मग हे आमदार स्वत:ला शिवसैनिक कसं बरं म्हणणार?’ अशी टोलेबाजी संजय राऊत यांनी केली आहे. 

शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात आहेत असेही राऊत यांनी सांगितले. किती आमदार मानसिकदृष्ट्या दुसऱ्या पक्षात जायला तयार आहेत याची माहिती आम्हाला आहे त्यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन दिसून येणार आहे असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपाला शिवसेना फोडायची होती आणि मराठी माणसाला कमजोर करायचे होते त्यात भाजप यशस्वी झाले आहे पण त्यांना फार काळ यश मिळणार नाही असेही संजय राऊत म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.