BMC निवडणुकिसाठी राज ठाकरे यांचा मोठा निर्णय

आगामी महापालिका निवडणुकिसाठी सगळेच पक्ष कामाला लागलेले आहे. मग यात राज ठाकरे यांची मनसे तरी मागे कशी राहणार आहे. मुंबई महापालिकेचे मैदान मारण्यासाठी मनसे सज्ज झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतलाय तो म्हणजे मुंबई महापालिकेची व्यूहरचना ठरविण्यासाठी ‘राज्यकर्ता’ या पुणेस्थित खासगी एन्जसीला काम सोपविण्यात आलेले आहे. राज्यकर्ता ही एजन्सी 100 वॉर्डचे सर्वेक्षण करणार आहे. ही एजन्सी मनसेला तीन टप्प्यामध्ये सॅम्पल सर्वेक्षण अहवाल सादर करणार आहे.
या अहवालातून संबंधित वॉर्डातील राजकीय स्थिती, मतदारांची भूमिका, वॉर्डाचा विकास आणि नागरी समस्या सोडवण्यासाठीच्या आवश्यक उपाययोजनांची माहिती आणि आढावा घेण्यात येणार आहे. मनसेची स्थापना २००६मध्ये झाली सध्या २०२२ सुरु आहे म्हणजे १६ वर्षांच्या कालावधीत प्रथमच मनसेने एका खासगी एजन्सीची मदत घेतलेली आहे.