मनसेच्या सदिच्छा भेटी वाढल्या ! नेमकी काय चर्चा झाली ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेले होते. गणपतीचे निमित्त होते पण त्या आडून नक्कीच काही खास चर्चा झाल्या असतील असे तर्क लावण्यात आले होते. आता आज पुन्हा मनसे आणि वर्षा बंगला चर्चेत आला आहे कारण मनसेचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदिप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय वर्षा निवसस्थानी हजेरी लावली आहे. ही भेट सुद्धा गणपती दर्शनासाठी झाली असे सांगण्यात आले आहे.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संदिप देशपांडे यांच्यात बराच वेळ चर्चा झाल्याचं सांगितलं जातेय.
संतोष धुरी, शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकरही तेव्हा उपस्थित होते. महापालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत त्यात मुंबई महापालिका, ठाणे महापालिका यांच्या निवडणुकांची घोषणा कधीही होऊ शकतो. त्यात मनसे नेत्यांचं ‘वर्षा’वर येणं जाणं वाढलं आहे. गणपती दर्शन हे कारण असलं तरी, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट-मनसे एकत्र लढणार का, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु आहे.