मनसेनं शिवसेनेला पुन्हा डिवचले !!

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच फूट पडलेली आहे. आमदार, खासदार, नगरसेवक अगदी शाखाप्रमुख देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. यामुळे शिवसेना पक्ष खिळखिळा झाला आहे. हीच संधी साधत मनसे आता सातत्याने शिवसेनेवर टीका करत आहे.शिवसेना आणि मनसेमध्ये सुरु असलेल्या शाब्दिक युद्धात आता मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनीही उडी घेतलेली आहे. शालिनी ठाकरे यांनी गुरुवारी एक ट्विट केले त्यात रेल्वे इंजिन भाड्याने द्या म्हणुन उपदेश देणार्यांवर धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आली आहे अशी टिप्पणी केलेली आहे. आता या टीकेवर शिवसेना काय उत्तर देणार हे पहावे लागणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला होता. मनसेच्या एकमेव आमदाराने विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने मतदान केले. शिवसेना-मनसे निवडणुकीत नेहमीच कट्टर प्रतिस्पर्धी राहिले आहेत. मात्र, आता शिवसेना खिळखिळी झाल्यानंतर मनसे आगामी निवडणुकीत याचा फायदा घेऊन आपला विस्तार करणार का, हे पाहावे लागणार आहे.