कारवाईनंतर मनसेची पोस्ट व्हायरल, तुम्ही पाहिली का?

पाडवा मेळाव्यातील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्यानंतर पोलिसांकडून माहिममधील अनधिकृत मजारीवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर मनसेकडून ट्विटद्वारे प्रतिक्रिया देण्यात आलीय.
मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पोलिसांच्या या कारवाईचं स्वागत करण्यात आलंय. यामध्ये राज ठाकरे यांचा पाडवा मेळाव्यातील भाषणाचा फोटो पोस्ट करत त्यावर महाराष्ट्रात अनधिकृत मजारींची मुजोरी चालणार नाही, असं लिहित. उखाड दिया ! असं लिहिलं आहे. तसेच या फोटोला गड्यांनो…माहिमची मोहीम फत्ते झाली, मजारीची मुजोरी उखडून टाकली! अशी कॅप्शन देण्यात आलीय.
दरम्यान, पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी स्क्रीनवर माहिमच्या समुद्रात एका बेट सदृश्य जागेत एक मजार तयार करण्यात आल्याचा व्हिडिओ दाखवला होता. या मजारीला भेट देण्यासाठी अनेक लोकांची ये-जा सुरु असल्याचंही त्यांनी या व्हिडिओचा संदर्भ देत सांगितलं होतं. त्यानंतर आज सकाळीच मुंबई महापालिका आणि पोलीसांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.
गड्यांनो… माहीमची मोहीम फत्ते झाली, मजारीची मुजोरी उखडून टाकली ! pic.twitter.com/0zQKMoszS7
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 23, 2023