विदर्भासाठी मनसेचा प्लान ठरला?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गणपती झाल्यानंतर नागपूर आणि विदर्भाचा दौरा करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.मनसे आणि भाजपची युती होवू शकते त्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपली संघटना वाढवण्यासाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतायेच. अनंत चतुर्दशी झाल्यानंतर म्हणजेच गणेश उत्सव संपल्यावर राज ठाकरे नागपूरसह विदर्भाचा दौरा करण्याची शक्यता आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. गुढीपाडव्याला झालेल्या भाषणानंतर आणि त्यानंतर झालेल्या सभानंतर मशिदींवरचा भोंगे आणि हनुमान चालीसा हे मुद्दे राज ठाकरेंनी मांडले होते. विदर्भात राज ठाकरेंचा दौरा नेमका कधी होणार? याबाबत आम्ही नागपूरचे मनसेचे सरचिटणीस हेमंत गडकरी यांना विचारलं असता त्यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.गडकरी यांनी सांगितलं की दोन आठवड्यांपूर्वी मुंबईतल्या रविंद्र नाट्यमंदिरात राज ठाकरेंशी चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी गणपतीनंतर विदर्भाचा दौरा करणार असल्याचं सूतोवाच केलं. मात्र या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. त्यामुळे नेमकी तारीख काय असेल हे मुंबईतूनच ठरेल असं हेमंत गडकरी यांनी म्हटलंय. या दौऱ्यात काय ठरेल ते येणाऱ्या काळात समजेलय.