राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर मोदींचा आवाज घुमणार!

राज ठाकरेंचा शिवतीर्थ बंगल्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवाज घुमणार आहे. हे वाचून आर्श्चय वाटले असेल ना पण हे खरं आहे. आता तुम्ही म्हणाल आतापर्यंत भाजप-मनसेच्या युतीची नुसती चर्चाच होती आता प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी राज ठाकरे यांना भेटायला शिवतीर्थावर येणार? पण तसं नाहीये…
मोदींचा आवाज शिवतीर्थवर घुमणार हे नक्की आहे. पण कसं? सध्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. विदर्भातील भाजप नेत्यांची राज ठाकरे भेट घेत आहेत. काल राज ठाकरे चंद्रपूर येथे होते पण सुधीर मुनगंटीवार तिथे नव्हते त्यामुळे त्यांनी राज ठाकरेंना विशेष गिफ्ट पाठवलं आहे.
नरेंद्र मोदींचं भाषण ऐकू येणारी खास भेटवस्तू मुनगंटीवार यांनी दिली आहे. राष्ट्रध्वजाची प्रतिकृती अशा प्रकारात असणारी ही भेटवस्तू आहे. त्याला काही बटणं दिली आहेत ती प्रेस केली असता माननीय पंतप्रधान मोदी यांचे भाषण ऐकू येते.त्यामुळे राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’वर मोदींचा आवाज घुमणार आहे.