दीड वर्षाच्या “बाळाचा” उल्लेख, मनसेनं टोचले उद्धव ठाकरेंचे कान

दसरा मेळाव्यात शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेते आणि विरोधक यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी भाषणात ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख कार्ट,असा केला, तर मुख्यमंत्र्यांचा नातू रुद्रांश याचावरही ठाकरे टीका करायला विसरले नाहीत. ठाकरेंच्या या टीकेला शिंदेंनी दसरा मेळाव्यातच प्रत्त्युतर दिलं. या टीकेवरुन रुद्रांशंचे वडील श्रीकांत शिंदे यांनीही ठाकरे यांना एक भावनिक पत्र फेसबुकवर लिहिलं. ते जोरदार व्हायरल झालं. टीका टिप्पणी होतच राहील. पण त्यात निरागसतेला ओढू नका हो. पाप आहे हे. आणि तेही कुठेही फेडता येणार नाही असं. त्या पापाचे धनी होऊ नका असा आशय त्या पत्रात होता.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दीड वर्षांच्या नातवावर केलेली टीका अनेकांना आवडलेली नाही. ठाकरेंवर याविरुद्ध जोरदार नाराजी व्यक्त करण्यात येतेय. आता या सगळ्यात मनेसेने उडी घेतली असून उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. खोके, गद्दार, खंजीर,सगळं समजू शकतो पण त्या दीड वर्षाच्या बाळाचा केलेला उल्लेख माननीय बाळासाहेबांना पण आवडला नसता असे ट्विट मनसेकडून करण्यात आले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टि्वट करुन उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय. सोशल मीडियावर देखील याची चर्चा सुरु असून राजकारणात नक्की कोणावर टीका करायची किंवा राजकारण किती खालच्या पातळीवर गेलेले आहे अशा चर्चा देखील रंगलेल्या आहेत.

“स्वतःला कुटुंबप्रमुख म्हणवणारा कोवळ्या जिवांचा बाजार मांडतो..?” श्रीकांत शिंदेंचं उद्धव ठाकरेंना पत्र
Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.