ठाकरे बंधू एकत्र येणार? शर्मिला ठाकरेंचं सूचक विधान

एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि राज्यात मविआर सरकार पडले आणि शिंदे सरकार स्थापन झाले. पण यात सर्वात जास्त नुकसान झालं ते शिवसेनेचे. कारण शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवानेते आदित्य ठाकरे शिवसेनेला पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न करत असताना उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. खरंतर याआधी अनेकवेळा असं म्हटलं गेलं पण प्रत्यक्षात मात्र काही घडलं नाही. पण आता पुन्हा ही चर्चा सुरु झाली आहे याला कारण आहे राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिलेली प्रतिक्रिया.
ठाकरे बंधु एकत्र येणार का असा प्रश्न शर्मिला ठाकरे यांना विचारण्यात आला होता. त्याचं उत्तर देताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, साद घातली तर येऊदेत. त्यानंतर ठाकरे बंधु एकत्र येणार का या चर्चांना उधाण आलेली आहे. शिवसेनेने पुढाकार घेतला तर ही युती होऊ शकते असाही विश्वास व्यक्त केला जातो आहे.पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना शर्मिला ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे.