‘आदिपुरुष’वरुन मनसेने भाजपविरुद्ध शड्डू ठोकला !

आदिपुरुष सिनेमा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या सिनेमाला ट्रोलचा जोरदार सामना करावा लागला आहे. आता या आदिपुरुषची चर्चा फक्त सोशल मीडियावरच होतेय असं नाही तर आता राजकीय वर्तुळातसुद्धा त्याचे पडसाद उमटले आहेत. भाजपचे आमदार राम कदम यांनी महाराष्ट्रात ‘आदिपुरुष’ सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असं सांगितलं होतं. तर मनसेने मात्र ‘आदिपुरुष’ला पाठिंबा दिलेला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी यासंदर्भात ट्वीट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
१)ओम राऊत या दिग्दर्शकाने यापूर्वी लोकमान्य आणि तान्हाजी या कलाकृतींमधून इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ओम राऊत यांनी साकारलेला भव्य लाईट ॲंड साऊंड शो आजही दिमाखात सुरु आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 7, 2022
मनसेकडून दोन ट्वीट करण्यात आली असून त्यात ओम राऊत याच्याकडून आदिपुरुषमध्ये अभ्यासपूर्ण मांडणी केल्याचा दावा करण्यात आलाय. ओमने याआधी ‘लोकमान्य’ आणि ‘तान्हाजी’ सारखे सिनेमे केले आहेत. ओम राऊत हा हिंदुत्ववादी माणूस असून हिंदुत्ववादी नेत्यांना माझा एक प्रश्न आहे की फक्त ९५ सेकंदच्या टीझरवरुन सिनेमा कसा असेल याचा अंदाज तुम्ही कसा काय बांधता? असा सवाल देखील अमेय खोपकर यांनी केलाय. ओम राऊत याच्या आगामी ‘आदिपुरुष’ टीझरवरुन टीका होणं हे दुर्दैवी आहे असे मनसेने स्पष्ट केले आहे. आता आदिपुरुषच्या बाबतीत काय होणार ते येत्या काळात समजेलच.