पुणे कोथरूड
कोथरूड येथील शिक्षकनगर भागात पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याचा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम परिसराचा विचार करता नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार आहे, याचा कुठलाही विचार न करता परवानगी कशी दिली असा सवाल उपस्थित करत कार्यक्रम रद्द करा अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा मनसेचे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमोल शिंदे यांनी दिला आहे.
शिक्षकनगर भागात सोसायटी भाग, सुतारदरा – जयभवानी नगर, शिवतीर्थ नगर भाग असा बहुसंख्य लोकवस्ती वसलेला भाग असून सह्याद्री रुग्णालय जवळ आहे. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ रस्त्यावर असते. येथील रस्त्याची रुंदी व वाहतुक पाहता रस्ता तुडूंब वाहनाने भरलेला असतो. अश्या भागात कार्यक्रम घेतल्यास वाहतुकीचा बोजवारा उडण्याची भीती वाटत असल्याचे मत स्थानिक रहिवासी अमृता धुमाळ यांनी व्यक्त केले.
शिक्षकनगर भागात सोसायटी भाग, सुतारदरा – जयभवानी नगर, शिवतीर्थ नगर भाग असा बहुसंख्य लोकवस्ती वसलेला भाग असून सह्याद्री रुग्णालय जवळ आहे. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ रस्त्यावर असते. येथील रस्त्याची रुंदी व वाहतुक पाहता रस्ता तुडूंब वाहनाने भरलेला असतो. अश्या भागात कार्यक्रम घेतल्यास वाहतुकीचा बोजवारा उडण्याची भीती वाटत असल्याचे मत स्थानिक रहिवासी अमृता धुमाळ यांनी व्यक्त केले.स्थानिक रहिवासी किरण उभे म्हणाले, सदर कार्यक्रम ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड करण्यात आली आहे. याबाबत कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती वृक्ष अधिकारी यांनी दिली. पर्यावरण ऱ्हास करून कार्यक्रम घेणे उचित नाही यामुळे प्रशासनाने ठोस पाऊले उचलत योग्य कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.
विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष शिंदे म्हणाले, स्थानिक नागरिकांनी कार्यक्रम होणार असल्याची माहिती देत. याठिकाणी कार्यक्रम झाल्यास गाण्याचा आवाजाने पर्यावरणाचे नुकसान होऊ शकते. लोकसंख्येच्या मानाने रस्ते अपुरे पडतात, कार्यक्रमाच्या वेळेस मोठी गर्दी होईल यामुळे आम्हाला घराबाहेर पडणे मुश्किल होईल. कार्यक्रमाबाबत आपण भूमिका घ्यावी अशी मागणी आमच्याकडे केली आहे.
याबाबत आम्ही प्रशासनाला जाब विचारला असता पालिका उपायुक्तांनी सांगितले की आम्ही कोणतीच परवानगी दिली नाही असे उत्तर मिळाले. तसेच पोलीस आयुक्तांना विचारले असता त्यांनी उपायुक्त यांच्याकडे चेंडू टाकला आहे. उपायुक्त यांची भेट होऊ शकली नाही. परवानगी नसताना नागरिकांना वेठीस धरून हा कार्यक्रम कसा होऊ शकतो नक्कीच यामागे बड्या व्यक्तीचा हात असा अशी शंका उपस्थित होते. याबाबत पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले असून हा कार्यक्रम तत्काळ रद्द करा अन्यथा नागरिकांसह उपोषण करण्यात येईल आणि ही सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील असे शिंदे यांनी सांगितले.