आदित्य ठाकरेंना दे धक्का ! ‘त्या’ निर्णयाची केंद्राकडून होणार तपासणी

एकनाथ शिंदे यांचा बंड त्यानंतर खासदारांनी सोडलेली साथ, धनुष्यबाण चिन्हासाठी सुरु असलेली कायदेशीर लढाई यामुळे शिवसेनेला दुहेरी लढाईचा सामना करावा लागतो आहे. यात आता केंद्राकडून शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. युवासेनाप्रमुख आणि माजी पर्यायवरण मंत्री आदित्य ठाकरे मोदी सरकारच्या रडावर आलेले आहेत.अडीच वर्षांच्या काळात आदित्य ठाकरेंनी घेतलेले निर्णय आणि एकूण कामकाजाचे मोदी सरकारकडून ऑडिट होणार आहे.
आदित्य ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.आदित्य ठाकरे पर्यावरणमंत्री असताना त्यांचे बरेच कौतुक करण्यात आले होते.मात्र आता केंद्रातून त्यांनी केलेल्या कामाची तपासणी होणार आहे त्यातून काय निष्पन्न होते यावर आता चर्चा होत आहेत. मोदी सरकार खास करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभाराचे ऑडिट करणार आहे. यामुळे मंडळातील अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मंडळाच्या कारभाराबाबत काही नव्या सूचना, उपाययोजना होणार असतील तर ते योग्यच आहे पण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची बदनामी होवू नये अशी अपेक्षा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, औरंगाबाद आदी विभागांतील कार्यालयात हे केंद्रीय ऑडिट सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यालयाबरोबर नागपूर कार्यालयाचा समावेश आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यामध्ये इतर विभागीय कार्यालयांचेही ऑडिट करण्याबाबत खातेप्रमुखांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.