धोनी गुडघेदुखीने त्रस्त,उपाय ऐकून व्हाल थक्क !

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. तेव्हापासून तो फक्त आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो.अलीकडेच तो एका मित्राच्या वाढदिवसाला दिसला होता. या दरम्यानचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
४० रुपयांमध्ये घेतोय उपचार !
धोनी गेल्या काही दिवसांपासून गुडघेदुखीने त्रस्त आहे. त्याच्यावर उपचारही सुरू आहेत, विशेष म्हणजे, त्याच्यावरील उपचार हे देशातील किंवा परदेशातील कोणत्याही मोठ्या रुग्णालयात नाही. तर ते रांचीपासून ७० किमी अंतरावर असलेल्या लम्पुकच्या जंगलात सुरू आहेत. धोनीवर वैद्य वंदनसिंह खेरवार हे उपचार करत आहेत. धोनी जवळपास एक महिन्यापासून तिथे जात असून अवघ्या ४० रुपयांमध्ये उपचार घेत आहे. वैद्य खेरवार यांना औषधांसाठी २० रुपये आणि फी म्हणून २० रुपये द्यावे लागतात.
धोनी महिनाभरापासून दर चार दिवसांनी तिथे जातो. तो वैद्य वंदन सिंग खेरवार यांच्याकडून उपचारांकरिता औषधी वनस्पती घेतो. धोनीच्या आधी या वैद्यांकडून त्याच्या आई-वडिलांनी देखील उपचार घेतले आहेत.विशेष म्हणजे, धोनी पहिल्यांदा त्यांच्याकडे आला तेव्हा ते त्याला ओळखू शकले नाहीत. लोकांनी त्यांना धोनीबद्दल सांगितले. ज्यावेळी तेथे उपस्थित लोक धोनी भोवती जमा होऊन फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे लागली त्यावेळी त्यांना धोनीच्या प्रसिद्धीबद्दल माहिती दिली.