पुन्हा भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी?

मुंबईतील भाजपचे आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर बोचऱ्या शब्दांत वार केला आहे. राम कदम यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. यामध्ये ‘संपवून दाखवलं!’ असा मजकूर लिहला आहे. राम कदम यांच्या या वक्तव्याचा रोख शिवसेनेच्या दिशेने असल्याचे दिसत आहे. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचार करताना शिवसेनेकडून ‘करुन दाखवलं’ ही टॅगलाईन वापरण्यात आली होती. तोच धागा पकडत राम कदम यांनी ‘संपवून दाखवलं’ असा मजकूर लिहून शिवसेनेला डिवचले आहे. यावर आता शिवसेना काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. किरीट सोमय्या यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंचा उल्लेख माफिया उद्धव असा केला होता. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. किरीट सोमय्या उद्धवजींबाबत जे बोलले ते चुकीचे असल्याचे केसरकर म्हणाले. त्याबद्दल आम्ही ताबडतोब फडणवीसांना सांगितले आहे. फडणवीस याबाबत निर्णय घेतील आणि यापुढे उद्धव ठाकरेंवर टीका होणार नाही, असा दावा दीपक केसरकर यांनी केला होता.

किरीट सोमय्या यांनी असं काही समजू नये, की आता शिवसेना संपली, ही तीच शिवसेना आहे व आम्ही सत्तेत भाजप-शिवसेना युती म्हणून काम करतोय, आम्ही बाहेर पडलो याचा अर्थ बाळासाहेब, उद्धव साहेब किंवा आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आमची श्रद्धा नाही, निष्ठा नाही आणि आम्ही त्यांना शिव्या-शाप देऊ, असा समज किरीट सोमय्यांनी करुन घेऊ नये. ज्या पक्षात आम्ही घडलो, त्या पक्षप्रमुखांना त्यांनी नाव ठेवू नये व यापुढे त्यांनी असं वक्तव्य करु नये, अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही, असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. यामुळे भाजप व शिंदे गटात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.