कारचालकांनो, ही महत्वाची बातमी वाचा!, सिटबेल्ट अनिवार्य; कधीपासून अन् काय आहे नियम?

कारचालक आणि प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे. मुंबईच्या सह पोलीस आयुक्तांनी एक प्रेसनोट जाहीर केले आहे त्यानुसार 1 नोव्हेंबरपासून कार चालकांना आणि प्रवाशांना सिटबेल्ट लावणं अनिवार्य आहे. कारचालकाने तसेच प्रवाशांनी सिट बेल्टशिवाय प्रवास केल्यास मोटार वाहन कायदा 2019 च्या अंतर्गत 149 (b) नुसार त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
Whoever drives a motor vehicle without wearing a safety belt or carries passengers not wearing seat belts shall be punishable: Mumbai police pic.twitter.com/bqcuJIk6go
— ANI (@ANI) October 14, 2022
वाहनचालकांना आणि प्रवाशांना कारमध्ये सिटबेल्टची सुविधा सुरू करण्यासाठी 1 नोव्हेंबरपर्यंतचा अवधी दिला आहे. मुंबईत प्रवास करणाऱ्या कारचालक आणि प्रवाशांना मुंबई पोलिसांकडून सिट बेल्ट लावणं अनिवार्य करण्यात आलंय. जर कारचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले तर पोलिसांकडून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.