मुंबई पोलीस ग्रेट का आहेत? हा व्हिडीओ पाहा

मुंबई पोलीस दल हे देशातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून ओळखले जाते. त्यांच्या कर्तव्यदक्षतेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मुंबईतील सहायक फौजदार विलास गुरव यांचा तो व्हिडिओ आहे. रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्याचा आवाज येताच त्यांनी जेवणाची सुट्टी असून देखील तत्परता दाखवली आणि रुग्णवाहिकेला वाट करुन दिली. हा व्हिडिओ श्याम गुप्ता यांनी ट्विटरवर पोस्ट करत पोलिसांचे आभार मानल्यानं विलास गुरव यांची कर्तव्यनिष्ठा सर्वांसमोर आली.

वरळी नाक्यावर १३ सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे. त्यांची जेवणाची सुट्टी होती पण त्याचवेळी वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेचा आवाज त्यांनी ऐकला. जेवण बंद करुन ते रुग्णवाहिकेला वाट करुन देण्यासाठी धावले. त्यावेळी विलास गुरव यांच्या जोडीला नव्हतं. मदतीसाठी कोणीही नसल्यानं एकट्यानं कार्य पार पाडलं.

विलास गुरव यांनी रुग्णवाहिकेला मार्ग मिळावा म्हणून दोन सिग्नल बंद केले आणि वाहतूक कोंडीतून रुग्णवाहिकेला वाट करुन दिली. विलास गुरव यांच्या कर्तव्यनिष्ठेनं त्या रुग्णवाहिकेतील रुग्णाला वेळीच रुग्णालयात पोहोचता आलं. मुंबई वाहतूक पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडून देखील विलास गुरव यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.