मेरी एक टांग नकली है, मैं हॉकी का बहुत बडा खिलाडी था! या डायलॉग मुळे फेमस झालेले वेलकम चित्रपट फेम अभिनेते मुस्ताक खान यांना खऱ्या आयुष्यात देखील १२ तास का होईना पण, गुंडांचा सहवास मिळाला. नुकताच अभिनेते मुस्ताख खान यांचे अपहरण झाल्याचा धक्कादाय खुलासा त्यांचे इव्हेंट मॅनेजर शिवम यादव यांच्याकडून करण्यात आला आहे. दरम्यान हे सर्व प्रकरण काय आहे? तेच जाणून घेऊयात
कॉमेडी कलाकार सुनील पाल यांच्या अपहरणाचं प्रकरण ताजं असताना अभिनेते मुस्ताक खान यांचे अपहरण झाल्याचा धक्कादायक खुलासा त्यांचे इव्हेंट मॅनेजर शिवम यादव यांच्याकडून करण्यात आला आहे. तर याबद्दल माहिती देताना शिवम यादव म्हणाले की, मुश्ताकला 20 नोव्हेंबर रोजी मेरठमध्ये एका अवॉर्ड शोसाठी बोलावण्यात आले होते. त्यासाठी त्यांना काही ऍडव्हान्स पैसे देखील देण्यात आले होते. त्यानंतर त्यांना विमानाचे तिकीट पाठवण्यात आले. तर दिल्लीत उतरल्यावर मुस्ताक खान यांना कारमध्ये बसवून दिल्लीच्या बाहेरील बिजनौरजवळ कुठेतरी नेण्यात आले.
अपहरणकर्त्यांनी मुश्ताक खान यांना सुमारे 12 तास कैद केले. तर त्याच्याकडून खंडणी म्हणून एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. यानंतर अपहरणकर्त्यांनी मुश्ताक व त्यांच्या मुलाच्या बँक खात्यातून दोन लाखांहून अधिक रुपये काढले. अपहरणकर्त्यांच्या तावडीत असताना जेव्हा मुश्ताक खान यांनि सकाळच्या अजानचा आवाज ऐकला तेव्हा आपण एका मस्जिदच्या जवळच असल्याचा अंदाज बांधत, संधी मिळताच ते तेथून पळाले आणि पोलिसांच्या मदतीने घरी परतले.
घडलेल्या सर्व प्रकारामुळे मुश्ताक आणि त्याचे कुटुंब चांगलेच हादरले होते. मात्र, स्वत:ला शांत करून त्यांनी घडलेल्या सर्व घटनेची माहिती बिजनौर पोलिसांना देत एफआयआर दाखल केली आहे. यावेळी त्यांनी त्यांच्याकडील विमानाची तिकिटे, बँक खात्याचे स्टेटमेंट आणि विमानतळाजवळील सीसीटीव्ही फुटेजचे पुरावे दिले. तर कोतवाली शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत कलम 140 (2) नुसार अपहरण, ओलीस ठेवणे आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकाच क्षेत्रातील दोन अभिनेत्यांना इव्हेंटच्या नावाखाली किडनॅप करण्यात आलं असल्याने यामागे एकाच टोळीचा हात असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. तर यावर तुमचे मत काय? ते कंमेंट करून नक्की सांगा