नाना तुम्हीपण?, चित्रा वाघ यांचं ट्विट

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना नेटकऱ्यांनी आज चांगलचं ट्रोल केलं आहे. त्यासाठी कारण ठरलाय एक व्हिडोओ. त्या व्हिडीओत काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. पण तो व्हिडओ ट्विटरवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शेअर केला आहे. आता त्या व्हिडीओमध्ये काय आहे? त्यात नाना पटोले एका हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात टाकून बसलेले आहेत. मेघालयमधील चेरापुंजी येथील हा व्हिडीओ आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून नानांवर टीकेची झोड उठलेली आहे. 

चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या?

भाजप नेत्या चित्रा वाघ फक्त व्हिडोओ शेअर करुन थांबलेल्या नाहीत याबाबत त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतलेली आहे. नाना पटोले यांचा हा धक्कादायक व्हिडीओ आहे. नाना पटोले असू दे किंवा कोणताही पक्ष पण जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी असता तेव्हा तुमची जबाबदारी अनेक पटींनी वाढलेली असते. सगळ्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे.असे चित्रा वाघ म्हणाल्या आहे. खरंतर कोणाच्या खासगी आयुष्यात डोकावणे चुकीचे आहे पण जेव्हा ती गोष्ट लोकांमध्ये येते तेव्हा, सार्वजनिक होते त्यावेळी ती खासगी होत नाही. आज सकाळपासून तो व्हिडोओ व्हायरल झाला त्यानंतर तो माझ्याकडे आला म्हणून मी नानांना विचारलं नाना तुम्हीपण ? असेही चित्रा वाघ यांनी सांगितले आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.