महाराष्ट्रात फिरण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल,ठाकरे-शिंदे गट वादात या नेत्याची एन्ट्री !!

शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडले आहेत.दोन्ही गटांमध्ये वैर आहे हे वेगळं सांगायला नको.गणेशोत्सवाची सांगता होत असताना प्रभादेवी येथे ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला. ठाकरे गटाच्या पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आली तर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची एंट्री झालीय. नारायण राणेंनी दादर परिसरात असलेल्या आमदार सदा सरवणकरांच्या घरी त्यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आला असून महाराष्ट्रात राहायचंय-फिरायचंय ना? असा उघड इशाराच सरवणकरांच्या भेटीनंतर राणेंनी ठाकरेंना दिलाय. माध्यमांसमोर बोलताना राणेंनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकेर यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.
मी गोंधळाला आलो नाही. सदा सरवणकर माझे मित्र आहेत. झालेल्या घटनेबाबत विचारपूस करण्याच्या हेतून मी त्यांची भेट घेतली. सरवणकर यांनी गोळीबार केली, यामध्ये कितपत तथ्य आहे? असा सवाल उपस्थित केला. यावेळी त्यांनी तक्रार दिली आहे. पोलिस याबाबत चौकशी करतील. फायरिंग झाली असेल तर आवाज येतो. आणि मातोश्रीच्या दुकानात बसून तक्रारींचं मार्केटिंग करण्याशिवाय दुसरं काही काम उरलेलं नाही असं वक्तव्य राणेंनी केलंय. आमची युती आहे, युती धर्मानुसार एकमेकांच्या मागे दोघांची ताकद असतेच. ५० जण एकावर हल्ला करायला आले, त्यासाठी अजामीनपात्र कलम ३५४ लागतो हे सांगायला राणे विसरले नाहीत.