देशातील स्वच्छ शहरांची यादी जाहीर; राज्यातील ‘हे’ शहर तिसऱ्या स्थानी !

केंद्र सरकारनं देशातील विविध शहरांमधील स्वच्छतेचं निरीक्षण केल्यानंतर यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांची घोषणा केली आहे. त्यामध्ये नवी मुंबई महापालिकेनं बाजी मारली असून देशपातळीवर तिसरा क्रमांक पटकावला आहे. इंदूर शहराने सलग सहाव्यांदा सर्वात स्वच्छ शहर पुरस्कार मिळवलेला आहे. यामध्ये सुरत दुसऱ्या स्थानावर तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्वच्छ शहर सर्वेक्षणाचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला होता.

‘स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022’ सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये मध्य प्रदेशने प्रथम क्रमांक पटकावला असून त्यानंतर छत्तीसगड आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागलेला आहे. इंदूर आणि सुरतने यावर्षी मोठ्या शहरांच्या श्रेणीत आपले अव्वल स्थान कायम राखले असून विजयवाडाने मात्र आपले तिसरे स्थान गमावले तिथे नवी मुंबईला ही जागा मिळाली आहे.

एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रामधील पाचगणी पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ छत्तीसगडमधील पाटण आणि महाराष्ट्रातील कराड यांचा क्रमांक लागलेला आहे. देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांचा दबदबा पहायला मिळत होता पण यावर्षी तसं काही दिसून आलं नाही. देशातील १० स्वच्छ शहरांच्या यादीत मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांना कोणतंही स्थान नाहीये. मात्र नवी मुंबईने इतिहास रचलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.