नवनीत राणांना केंद्रात मोठी जबाबदारी? रवी राणा म्हणाले..

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध खासदार नवनीत राणा यांनी चांगलंच रान उठवलं होतं.राणा यांचे हनुमान चालीसा प्रकरण राज्यात खूप गाजलं त्यानंतर शिवसेना आणि राणा यांच्यात झालेली शाब्दिक चकमक, अटक यामुळे राणा दांम्पत्य चांगलच चर्चेत आलं होतं. नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंविरद्ध उठवलेला धुरळा थेट दिल्लीच्या दरबात पोहचला आणि आता एक नवीनच चर्चा सुरु झाली. नवनीत राणा यांना केंद्रात नवीन जबाबदारी मिळणार अशी चर्चा सुरु आहे. यावर आमदार रवी राणा यांनी भाष्य केले आहे.
देशाच्या योगदानात कोणं चांगलं काम करत आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच माहित आहे. त्यामुळे कोणाला देशाच्या मुख्य प्रवाहात आणायचे ते मोदीजी ठरवली. खासदार नवनीत राणा यांची राजकारणावर चांगलीच पकड आहे. महाराष्ट्रासोबत पंजाब आणि दक्षिणेकडील राजकारण त्यांना चांगलेच समजते. त्यामुळे नववीत राणांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार हे निश्चितच आहे.
यावेळी रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ही भाष्य केलं. राणा म्हणाले, उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांना बुडविण्याचे जास्तीत जास्त काम संजय राऊत यांनी केलेले आहे. ठाकरे यांचे अस्तित्व संपवायची सुपारी संजय राऊत यांनी घेतली आहे असा आरोप देखील राणा यांनी केला. मंत्रिपदाबद्दल विचारले असता राणा म्हणाले, मी कधीही मंत्रिपद मागितलं नाही. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत काम करुन विदर्भ आणि महाराष्ट्राचा विकास करायचा आहे.