शरद पवारांच्या ‘टीम राष्ट्रवादी’ची घोषणा ! ‘या’ नेत्याचं केलं प्रमोशन !

राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. 10 आणि 11 सप्टेंबरला दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अधिवेशन झालं त्यात शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली. आता पवारांनी पक्षातली कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारणीतील महत्त्वाचा बदल म्हणजे नवाब मल्लिक यांना डच्चू देण्यात आला असून जितेंद्र आव्हाड यांचे प्रमोशन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी प्रफुल पटेल, मुख्य जनरल सेक्रेटरीपदी सुनिल तटकरे तर महाराष्ट्रातून राष्ट्रीय कार्यकारिणीवर अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीवर घेण्यात आलेलं आहे.
मलिक आणि आव्हाड हे दोन्ही राष्ट्रवादीचे प्रवक्ते होते पण आता नव्या कार्यकारिणीनुसार नवाब मलिक यांचं प्रवक्तेपद काढून घेण्यात आलं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर कामगार, एससी, एसटी व सहकार या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांना राष्ट्रीय सरचिटणीस पद देण्यात आलंय. खासदार सुनिल तटकरे यांच्यावर पक्ष संघटना, महिला कॉंग्रेस, अल्पसंख्याक, किसान सेलची जबाबदारी तर नरेंद्र वर्मा यांच्यावर मिडिया आणि आयटी जबाबदारी सोपवण्यात आलीय.